पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा उद्योग कम्युनिस्टांचा चालू राहिला! कधी दलवाईंना अमेरिकेचे एजंट म्हणून संबोधण्यात आले तर कधी त्यांना हिंदू जातीयवाद्यांकडून दरमहा पैसे मिळतात, ते भाडोत्री प्रचारक आहे, असे सांगण्यात आले! पण ज्या दिवशी काँग्रेस सत्तेतून खाली उतरली - त्यानंतर काही महिन्यांत समाजवादी मंडळींच्यापैकी काही जणांनी दलवाईंच्या अनुयायांना आपले काम गुंडाळून टाकण्याचा वडीलकीच्या नात्याने प्रेमळ सल्ला दिला!

व्यर्थ चर्वितचर्वण

वर्ग-वर्ण निराकरणाच्या लढयाचा विचार करताना मुस्लिम प्रश्नाचा विचार करायचा नाही, अशी सर्वसामान्य प्रथा आहे. वर्ग-वर्ण निराकरणाबाबत फक्त हिंदूच्या इतिहासाविषयी बोलायचे, मुस्लिम समाजातील परंपरावादाविषयी बोलायचेच नाही, हे पथ्य सर्वांनी पाळायचे ठरवलेले दिसते ! भारत नावाच्या एका राष्ट्रात मुस्लिम परंपरावाद जतन करून सांभाळीत न्यायचा, ख्रिश्चन परंपरावाद जतन करून सांभाळीत न्यायचा, लबाडी, दडपण आणि फसवणूक यांचा वापर धर्मपरिवर्तनात होऊ नये याच्या कायदेशीर तरतुदी करून धर्मस्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाचे जतन करावे, अशी भूमिका घेणारा कायदासुद्धा हाणून पाडायचा आणि नंतर मग वर्ग-वर्ण निराकरणाचे चर्वितचर्वण करायचे, ही बाब राजकीयदृष्टया सोयीची आहे असे जर कोणाला वाटत असेल तर मी त्यांच्याशी सहमत नाही, म्हणनच या विवेचनात मुस्लिम समाजाचा मी मुद्दाम उल्लेख केलेला आहे.

व्यवहारचातुर्याचा अभाव

एका राष्ट्रातील मुस्लिम, ख्रिश्चन यांचा मिळून होणारा एक मोठा गट चर्चेतून बाहेर ठेवायचा ही बाब दोन दृष्टींनी धोक्याची आहे: मुस्लिम समाजातील परंपरावाद तसाच शिल्लक राहील आणि हिंदू समाजातील परंपरावाद ओसरत जाईल, ही घटना घडण्याचा संभव नाही. हिंदू समाजातील जातीयवाद आणि परंपरावाद हिंदू समाज

१२