पान:वय माझे पाच हजार.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

        आर्तता
  नयनातले भाव, भावना वाचेल कधी कुणीही
  काळजाच्या आर्ततेला तुजवीण जाण नाही
  श्वासातल्या लयीचाही चुकुनी येईल सांगावा 
  उरी छेडल्या झंकाराला तसाच ठेका कुणी धरावा
  निरपेक्ष दाट तव मैत्री जणू जुळ्याचेच ते दुखणे
  राहो निरंतर साथ तुझी म्हणुनि माझे लाख बहाणे 
  विसरू कसे तुझे ते आर्त नयनी दारी उभे रहाणे
  क्षणात दुसऱ्या भेटी बिलगुनि उरातुनि विरघळणे
  लांब झाल्या सावल्या तरी रुसवा तुझा असा का
  नाही जुळणार कधीच तारा त्या छेडण्या पुनः का 
  साथ तुझी युगे युगांची वाटे, मग स्वप्ने उसवलीस का
  सोबत तुझी सुटली सखे तरी भैरवी अर्धीच का
  नजर माझी पैलतीरी तिथे कशी अजून तू 
  जड झाल्यात ग आठवणी का होतेस चाहूल तू 
  सलीस उभी तू देखणी उजळून दीप अंगणी 
  जाणून भासच हा रुसे शुक्राची मनी चांदणी


  ४९ / वय माझे पाच हजार