या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
________________
साथ संगत
सवे जायचे होते ना सखे दूर त्या क्षितिजा पलीकडे ओलांडली ना वेस तोवरी एक पाऊलहि नच तोकडे
नाही कळले मला क्षितिजी सांज ग झाकोळली ते उमलणे उमजलेच ना, का पाकळी विलगली
केवढा तो जोश, उन्मेष सारीपाट मांडताना एकटाच फेकतो फासे सोंगट्या उदासताना
किती वसंत, वर्षा वाजत गाजत आले गेले तुझे सखे ते हसणे फुलणे पहायचे राहूनच गेले
थकलो आता वाट पाहुनि, डोळे सुकले अधाशी पेलवेना पापण्याना प्रतीक्षा सांग रुजवात घालू कशी
किती दूर क्षितिज, मी चालतो एकला काट्यावरी राहीन उभा तोवर तेथे, पण देईन साद हाकेवरी
का अचानक झाले आपुले मार्ग वेगळाले आज का ते श्वासलेले गंध सारे पांगले
नव्हताच कधी तू सोडलास हात माझा मोकळा नजर पड़ता चाफेकळीवर श्वास आजही कोंडला
वय माझे पाच हजार / ४८