Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

    संकेत
   वेचून
   मंद, धुंद श्वास
   कधी जाईजुईचा बहर 
   भरगच्च उरी भरुन
   तर कधी गंधीत शुभ्र 
   टपोरा, मोगरा माळून 
  असो घनदाट अंधाऱ्या 
  अवसेच्या स्तब्ध राती,
  वा शिंपिल्या चांदण्या
  एकाकी शय्येवरती
  मी वाट पहातो आहे..
  मीलनाचा संकेत तुझा 
  विरला सर्द पापण्यात 
  बघ दूत उभे उषेचे
  व्यापून आसमंत




४७ / वय माझे पाच हजार