पान:वय माझे पाच हजार.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

        तू
  मी ओळखून आहे तुझ्या पापण्यांची साद
  मऊ दुलई ओढू घेते रंगल्या रातींची याद
  माळून गजरा मोगऱ्याचा, रात सुगंधी न्हाते
  लाजलाजूनी रातराणी ती हळूच कुशीत शिरते
  ओळखून उताविळ, माझ्या नजरेची पाखरं
  चूर लाजुनि तुझी कळी मग उमले हळुवार
  देऊ नको सखे,असे ते तुझे आळोखेपिळोखे 
  बोलावित ऊन्हा कोवळ्या क्षणात उगवे दिवसधुके
  ओठस्पर्श तव मोरपिशी, रात हरखूनी जाते
  थरथर होई काळजात अन् दूर ज्योत लाजून मिटे 
  जड झालेले ओठ तुझे अन् कुजबुज कानी उरली 
  उबदारशा मिठीत माझ्या नकळत पहाट न्हाली
  जपली रातीची आहे याद कुपीत जपली मनी
  शब्द जरी वाऱ्यावरी गेले, गात्रे गेली थकुनी
  खट्याळ हासत ओळ अंती तूच छेडली कानी
  एक रानटी वाट फुटावी का त्या शय्येवरूनि



   ४५ / वय माझे पाच हजार