पान:वय माझे पाच हजार.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

         साद तुझीच ती
    अजून स्मरते, तुझे गीत चांदण्यांचे
    चुरल्या राती, स्पर्श मोरपिसाचे
    नाही कळले, जिवांचे चांदणे झालेले 
    धुंद श्वासात कण कण मंतरलेले
    ये ना सखे तू, फसवून चोरपावली
    ओढून आपुलि, ती शाल मखमली
    हरवू दे ना, मज तव घनदाट कुंतली 
    घे मिटून बरसत, धुंद अधर सावली
   ना जाई जुई, गंध उधळत आल्या
   ना तुळस अंगणीचि चिंब भिजुनि गेली
   पहाट झाली, कानी कुजबुज ओली  
   साद तुझीच ती, आठवण होऊन आली!




                                              वय माझे पाच हजार / ४४