या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
________________
सखी
विसरू कसे तुझे ते गीत चांदण्यांचे विसरेन का सांग सखे रंग मोरपिसाचे कळलेच ना सरले किती क्षण रात्रींचे कुणा ठाव किती उमलले दिवस सोनियाचे
येशील का ओढून ती शाल मखमली घेशील मज मिटुनि धरुनि अधर सावली अंधारून टाक मला घनगर्द कुंतली
तुजविण अंगणी तव तुळस बघ कोमेजली परसदारी साद द्याया गायही नच हंबरली
वय माझे पाच हजार / ४२