Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

            कधी कधी
        नदीसारखं जगावं
        सहन होतय तोवर सारा कचरा बरोबर ठेवावा
        बरोबर ठेवावा
        फारच वाढला तर आपणच
        वळण घेऊन तिथंच सोडावा
        भूतकाळाचा गाळ पायाशी ठेवून 
        पुढं पुढं वहातच रहा
        येणाऱ्यांनी यावं, बघावं
        बेफाम होऊन उधळत रहावं
        हरवून आनंदात सदा उसळावं
        आपण आपलं वहात रहावं
        कौतुक काठावर पेरत जावं
        तुझं पण नदी सारखचं होतं
        स्वतःसाठी कधी जगणंच नव्हतं
        निरंतर तुझं हसणं होतं, फुलणं होतं 
        कोमल मनी फक्त बहरणं होत

        आजन्म सोबत वचनी बांधलीस
        शपथ सुटली म्हणालीही नाहीस 
        वाटलं होतं येशील चोरपावली 
        ना तू फिरकलीस, ना तुझी सावली
        किती रंगला होता गं डाव
        खोल हृदयी तो अजुनि जपला
        तू नाहीस पण तुझ्या खुणा
        येतात कधी कधी सोबतीला...


       ४१ / वय माझे पाच हजार