या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वप्नगंधा
हलकेच उलटूनी माप तू आलीस स्वप्नगंधा मग नाजूक पाऊली उमलत झालीस भावबंधा उधळुनी मापासवे, स्वैर यौवन बंधमुक्त झाले धडधडत्या तव हृदयामधुनि चंदनधुंद गंध झाले सरू नयेत कधीही स्पंदने उन्मत्त श्वासातली विसरू नयेच कधीही ती शपथ, पापण्यात भिजलि किती उतावीळ! ममहृदय, तू क्षणी जोखलि विभावरी माझे बिंब मी पाहिले हरपुनि, तव हृदयी बिलोरी नको सोडवू सखे कर माझे, नको सोडवू ही मिठी नको थांबवू कुंजने, कदापि कानातली चोरटी सजा भोगण्या कसलीही सदा तैयार मी यामिनी शपथ तुला, नको कोमेजू तू कधीच सौदामिनी सखे चालू दूरवर, एक हीदम, जन्मजन्मांतरी चित्रगुप्ताद्वारी लाजे राजहंसयुगुल खास... तोवरी !
वय माझे पाच हजार / ३८