Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पितृपक्ष
             त्या थंडगार वंशवृक्षाखाली
             निरांत सोबत स्मरण सावली
             मऊ पाऊले मातपित्यांची
             कधी पखरण सुसंस्कारांची
             कधी शिकवण मार्दवतेची
             बोलण्यातूनही नम्रतेची
             नात्यांची गाठ घनिष्ठतेची
             पक्की फांदी क्षमाशीलतेची
             भाषा सदा जिव्हाळ्याची
             बोच असावी उद्दामतेची
             शिदोरी ही पिढ्यापिढयांची
             ओलावलेल्या आठवणींची

---

३९ / वय माझे पाच हजार