या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गर्भ
मुळावर सोसू किती घाव गळती पाने, कोवळी फळे किती घाव कुऱ्हाडीचे कठोर जड झाले ओझे उरावर
का केलीस वसाड ही सृष्टी आता वरुणाची इथे वक्रदृष्टी ढग पण रडून झाले मोकळे मिटून डोळे सूर्य पसरे झाकळे
चहुबाजूला द्वेषाचे फुत्कार गे सरस्वती कर वीणेचा झंकार आपुले सारे संचित पुण्य जोडी बाळासाठी नाळेतून
आता एक ज्ञानेश्वर माऊली उभी देई संगे गीतेची सावली पायऱ्या कठीण हात देईल सोपान मागे मुक्ताई उभी देईल प्रकाशाचे दान तो एक गुरू रे धीराचा सडा पडेल आशीर्वादाचा
राहिला एक आधार आता मज आईच्या गर्भाची दोरी काय दुःख सावरून बसला श्रीकृष्णाने तर द्वारका सोडली
३७ / वय माझे पाच हजार