या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नद्या नद्यांच्या अमृतभेटी
हो ! गुंफतील सरिता एकमेकींचे हात हातात आता होणार रे मातृभूमी माझी सुजलाम् सुफलाम् आता जाऊ देत, धर्म, जाती एकारंगी मिसळून आता मानवतेचा ध्वज फडकू दे, विश्वासाठी भारतमाता
सुखी राहो विश्व सारे ज्ञानेश्वरे रेखीले स्वप्न उराशी ना निद्राधीन कुणी जीव तो ना राहो तळमळत उपाशी प्रश्न पडे मज भगीरथाने, उदंड पाणी का आणावे ? असेल पडले स्वप्न तयाला, अवनीने हिरवे लेणे ल्यावे
पुरे झाले धर्मासाठी गर्दन उडवून रक्त पिणे अरे मानवा आपुले या धरती वर, दोन घडीचे जिणे का निर्मिले ईश्वराने ठेऊन तुला अटल विश्वास वृक्षवल्ली सकल प्राणीजीवा द्यावा ना मोकळा श्वास
स्वार्थी होऊन नकोस वळवू जल सारे आपुल्याच दारी मुके प्राणी तहानलेले सोडतील प्राण कोरड्या किनारी नकोस लावू धावण्या तृषार्त मुकजीवा मृगजळापाठी होईल व्याकुळ भगीरथ तेव्हा थेंब थेंब अश्रूसाठी
तुडुंब भरला सागर आता प्रलय आणलास रे तू जोडून नदीला नदी शेतकरी पाजू दे पाणी शिवारी तृप्त जाहली बघता सृष्टी आनंदाने उधाणेल सागर त्यास वाहुनी घोर-चिंता, निवांत नीज घेईल ईश्वर!
ओवाळून ज्योती देशील तू, तो शालू हिरवा वसुंधरेला देव देवता इंद्रा सवे बघ हर्षे मिळवतील स्वर्गधरेला!
वय माझे पाच हजार / ३६