या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाही भरून आल्या !
आता असंच चालायचं! जुने दिवस आठवत हुंदका गळ्याशीच घट्ट रिचवायचा ! वाटलं होतं म्हातारपणी आपली नात्यागोत्याची मंडळी थोडी तरी सावली धरतील डोकीवर ! कुणीच जवळ फिरकलं नाही! रस्ता रुंदीकरणाची सुटबुटवाली धुळ उडवत येऊन गेली! छाताडावर एक मोठ्ठी फुली मारून गेली! मनात म्हटलं पुढच्या फेरीला चार माणसं तरी घेऊन या रे सायबानू! हाडं आहेत माझी चितेला फक्त खांद्याला चार आणि पुढं मडकं धरून रडायला एकच हिरवी गार डहाळी आणाल का रे? शपथ आहे तुम्हाला !
३५ / वय माझे पाच हजार