या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शपथ
काय छान दिवस होते ते! किती बिनधास्त आपले संसार मांडून घरटी सजवून रहात होती. कुठून कुठून एकेक काटकी चोचीतून आणून घर सजवत होती ! छकुल्यासाठी सहज परवडणारी आपल्याच उपटलेल्या कोवळ्या कोवळ्या पिसांची मऊ गादी बनवून लुसलुशीतपणाची पन्नास वेळा खात्री करून घेत होती! दुष्ट घारी कावळ्याची नजर चुकवायला मीच आडोशाची खोबण दाखवली होती! छोटी छोटी पिल्लं आईबाबा नसताना मीच सांभाळली होती! नवीन पालवी फुटली की दिवाळीचा आनंद सगळ्यांनी पाहुण्यांसह लुटला होता! झालं की जगून !...
आता कुठली पालवी फुटायला! डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली वर्षभर ! कुणीच नाही फिरकलं रे ! पायाशी घडीभर टेकायला पण कोऽऽऽणी नाही धजावलं! अंगावरच्या खपल्या एक एक गळून गेल्या! पण जखमा काही पुनः
वय माझे पाच हजार / ३४