या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अशाच एका वळणावर.. अशाच एका वळणावर थकुन बसलो होतो मैलाच्या दगडावर दूरवर वळून पाहिले मागे खूपच चालून आलो आपण! राहूनच गेलं... अरे! पण चित्र रंगवायचं मग आता आपण एकटेच का ? किती लोकांची साथ सोडली आपण किती लोकांचे बोट सोडले आपण किती लोकांना दुखावले आपण काय काय द्यायचे राहून गेले काय काय सांगायचे विसरून गेले कुणावर उगा रागावलो आपण कुणाचा नाही काढला रुसवा क्षमा कुणाला करायची राहून गेली कुणाची माफी नाहीच मागितली कुणाचे अश्रू पुसायचे राहून गेले कुणाला जवळही घ्यायचे राहिले आता उजवीकडे पाहिले अजून किती चालायचे... नाही उमजले मग हे सारे करायचे केव्हा थकलो ... जमेल तरी का आता ? जाऊ दे..... चार तरी अश्रू इथेच वाहू देत निदान माफी मागितलेली कळू दे... देवा फक्त माफी मागितलेली कळू दे... वय माझे पाच हजार / ३२