पान:वय माझे पाच हजार.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या आईची आठवण करून दिलीस

                 परत तसंच मिठीत घ्यावं वाटलं रे तुला
                 पण हातच हलेनात! पुन्हा ओक्साबोक्शी रडलास
                 म्हणालास गुरुदक्षिणा द्यायची राहीली गुरुजी
                 तुझे गरम अश्रू माझ्याच डोळ्यातून ओघळले
                 घटा घटा प्यालो...
                 खूप बरं, गंगाजळ प्याल्यागत वाटलं
                 कुणी न दिलेली मिळाली गुरुदक्षिणा
                 आता एकच कर तुझ्या घराला
                 कुंपण कधी घालूच नकोस
                 दारही सतत उघडच ठेव
                 तू माझ्याकडं आलास ना तसाच
                 कुणी खोल कोरडया डोळ्यानं
                 तुझ्याकडं पण नक्कीच येईल
                 जनावराहून हीन मानव जात असते
                 येणारच आणि येतच रहातील
                 तूच थारा दे बाळा त्यांना...






३१ / वय माझे पाच हजार