Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुरूदक्षिणा

             मी मानव तू ही मानव
             मग केल्या कुणी या सरहद्दी
             मी ब्राह्मण, तू मागास
             हा यवन, तो किरीस्ताव
             साऱ्या धरणीमातेचे पाडले प्लॉट
             घेतले वाटून आपापसात
             इकडे तू येशील तर खबरदार
             तंगडं तोडीन फिरशील दारोदार
             बरं केलंस तू माझंच दार ठोठावलस
             तू निष्पाप, उगा बळीचा बकरा झालास
             आई बाबा लहान्या भावा बहिणीला
             अग्नी देऊन अश्रू पुसून आलेला तू
             आणि...
            तुझं घरदार जाळून, शेकत बसलेला समाज
            म्हणालास गुरुजी मी इथंच रहायला आलो
            विश्वासाला दाद देत घेतलं मिठीत तुला
            आज मात्र यायला जरा उशीरच केलास
            तू तरी काय करणार? मी नव्हतो बाप तुझा
            तुला रजा तरी कशी मिळणार ?
            शिवाय विमान, व्हिसा सारे उपचार
            थेट माझ्या थंड गार शरीरावर पसरलास
            तू एकटाच ढसा ढसा रडलास
            शांत झालास कपाळावर ओठ टेकलेस
            केसातून हळुवार हात फिरवलेस



                                           वय माझे पाच हजार / ३०