पान:वय माझे पाच हजार.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इथे तर सारेच क्षणभंगुर

              माझेच हे सारे तर मग मागू काय देवा तुला ?
              मी क्षणांचा वाटसरू रेऽऽ मज मालकी हवी कशाला ?
              सारे इथून घेतलेले मग वाटे देऊ कुणाला ?
              उधळून टाकण्याचे हे क्षण, मोजू तरी कशाला ?
              केली दुःखात साथ ज्यांची श्रीमंत करी मनाला
              चैनीतल्या सुखांची मग झोळी बाळगू कशाला ?
              दे फेकून उधळून दे सारे, ते तर येथून घेतलेले
              क्षणभंगूर आयुष्य तुझे रे, श्वास न् श्वास मोजलेले
              केलेस खूप गोळा, मांडलास व्यस्त पसारा
              का अज्ञात तुला रेऽऽ हा प्रवास घडीभर सारा
              मांडून हिशोब चोख, तू रोज ठेविसी उशाला
              राहील शून्य बाकी मग मोजतोस तरी कशाला ?
              आता राहिला एक प्रहर ! जाईल अवसान गळून पार
              वाहतील निर्जीव फुलांचा हार, मुर्दाड वृथा अश्रू चार
              अजूनही मन का बेताब का सुसाट उधळे सैरावैरा
              ना राहील देह वेड्या, ना राखेल राख तो पिसाट वारा



                                                 २९ / वय माझे पाच हजार