या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एकचि रंग
गाता पांडुरंग दिसतसे एकचि रंग
जाळुनी अहंकारा हो विठ्ठलनामी दंग
ना कणभर ओझे वाहिले जन्मता तू कुशी
काय शोधीशी तू पर्वत मायेचा तव उराशी
कूस जोडून मायेची ऊब नवकोट नारायणाची
माऊली ठेवून उपाशी रास कुणा हवी रे सोन्याची
माऊलीच्या पदराविना रडे, राजा होई रोज भिकारी
उघड डोळ्यावरची झापड कर जोडूनि विठू चाकरी
दिसते ना रे सरळ वाट तुज, तिथेची विठुचे धाम
बघ विठ्ठल चरणी संतोषे, तो मैतर हरीचा सुदाम
काय माझे काय तुझे, हृदयी उभा विठू सावळा
बघ अनवाणी नाचे कैसा आनंदे संतांचा मेळा
विचार माऊलीला का मानव जन्म हा तुज आला
नको रोज साठवू अपुण्याईच्या धनराशी उशाला
वाटते जरी जाशील रथातून पांघरून शेला जरतारी
कफन राख ही जपेल खचितच फक्त विठ्ठला विठ्ठला
वय माझे पाच हजार / २८