Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रीकृष्ण

           स्वप्नात शोधतो मी ती श्रीकृष्णाची मुरली
           वर्षे हजारो झाली ना धुंदी तरी ओसरली
           गोपगोपिका झाले वेडे धुंद जाहली कालिंदी
           शांत झाल्या गाई गोजी विसावल्या चिदानंदी
           वृक्षाची त्या गडद सावली पाय पसरून बसली
           क्षणात कैसी पक्षी कुंजने शांत शांत जाहली
           कळेचना मज गीताई तव अर्जुना काय सांगे
           चेतवता तू मुरलीचे सूर चराचरांचे अंतर्मन जागे
      कोण म्हणतो राम होता, होती त्याची सीतामाई
      वानर कधी सेतू बांधती खुळचटच ती नवलाई
      हजारो वर्षांचा इतिहास आता झाला पुराणवादी
      थोर शूर वीर मर्दानी हरले इतिहासकारांच्या नादी
      सांगू कृष्णा तुला ? ठेव मुरली घट्ट तुझ्या करतली
      अस्तित्वावर तुझ्या बघ आता कृष्णछाया दाटली
      हतभागी आम्ही षंढ येईना चेव मुळी मुठी वळोनी
      वाट पाहू किती, का तुला कळेना चढली धर्माला ग्लानी


     ---





२७ / वय माझे पाच हजार