या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शोध
आज अचानक कातर वेळी आला कसा गं कान्हा दारी तुझी राधा किती बावरी कुठे लपवेल ती तुझी बासरी ?
हळूच गेली मग परसदारी फितूर तुला, ती गाय हंबरी जग सारेच तव नयनी विरले तरी बावळी तव अंतरी लपली
म्हणती, ठेविले अनंते तैसेचि रहावे पण इर्षा मनी आपलेच भाग्य उजळावे पण शोध शोधुनी ना मुळीच कळले कैवल्य अंतर्मनी लोळत पडले
या विश्वात्मक देवा अंतरी माझे मीपण सुखे लपवावे का युगे युगे पैलतीरी शोधावे सारे गवसेल तो तोषता, पसायदाने
---
वय माझे पाच हजार / २६