या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी केंव्हाची वाट पहातोय
जाताना बराच वेळ कारणं सांगत होता म्हणाला घराच्या भिंती द्वेषाच्या आहेत आणि खिडक्याना तावदाने रागाची कळतं का तुला काही दारे सताड उघडी ठेवलीस असूयेच्या वादळासाठी
तू या घरात आलास तेव्हा मांगल्य हसत होतं भेदभावाची पुसटशी रेषा पण नव्हती ना हसायला मर्यादा होती ना मनसोक्त रडायला बंदी ना कुणाच्या मुक्त प्रवेशाला नाराजीचे काटे होते
तू मोठा होत गेलास तसं सारंच नासत गेलं मालकी हक्क गाजवत गेलास कपड्याचा हव्यास, पैशाचा हव्यास श्रेष्ठतेचा पण सगळं माझं माझं म्हणत गेलास या घराच्या विटेविटेवर तुझं नाव कोरत गेलास
मला नाही करमत इथं आता, परकं वाटतं म्हणालास आणि सरळ चालू लागलास एकदाही वळून न पहाता
मग मात्र मी हादरलो.. विटके पडदे फाडून टाकले खिडक्या दारं सारं सारं बदलू लागलो खोट्या भिंती पाडून टाकल्या सारं आभाळच घरात घेतलं येणाऱ्या जाणाऱ्याला सताड उघडं ठेवलं
वय माझे पाच हजार / २४