पान:वय माझे पाच हजार.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विरह

विरह तुझा चित्ती राहो, नयनी तुझे रूप गळा तुझे गोड नाम हृदय होवो चिरदंग रमो मन नामस्मरणी माथा सदा तुझ्या चरणी उठो वादळ एकच भवती 'पांडुरंग' 'पांडुरंग'।।

कर तुझे कटेवरी देती आशीर्वाद अमृतधारा एकदाच दे कटाक्ष देवा नको प्रसाद दुसरा गळो द्वैत एकदाचे फुलो मनाचा पिसारा घुमो नभी एकच स्वर रे ‘पांडुरंग’ ‘पांडुरंग'।।

फिरलो किती दाहीदिशा दाटे अंतरी निराशा तूच दे रे टाळी आता होवो गजर दिशादिशा भेदभाव रक्तामाजी नासले गोजिरे बियाणे औंदा पिको तरारुन भाव 'पांडुरंग' ||

दिसांचे क्षण राहूनी गेले किती अधांतरी मायबाप वृध्दाश्रमी नाम्या झोपला अंधारी काय दिवस आले बापा नको राहू विटेवरी घ्या हो तुम्ही टाळ, मुखी बोला 'पांडुरंग' ।।

दोन फुटी जमिनीसाठी धार कुऱ्हाडी लावता तुटली सारी नाती गोती भाऊ भावा पुसे पुसता ना राहे बहिणाबाई नाही सुटली कोवळी पोरं गाऊ कसा कसायासंग देवा 'पांडुरंग' ।।


१९ / वय माझे पाच हजार