पान:वय माझे पाच हजार.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देव व्हावे

ऐकलं होतं माणसातच देव असतो पण पाहिलाच नाही कधी ...हां! राक्षस मात्र पदोपदी म्हणूनच, अजूनही उघडी द्रौपदी

भाऊ बहिणींची मायाही आटली टीचभर जागेसाठी कोर्टाच्या पायरीवर

जराबी लाज नाय वाटली बापाला बाप म्हणणं रोजचंच जणू गाऱ्हाणं मरण्या अगोदर मुकाट्यानं फक्त सह्या करणं

मान कापणं, गळा कापणं गवत कापण्याएवढं सोपं झालं ते आता काम शिंप्याचं नाय राहिलं

आया रडतात बाया रडतात मुलं रडतात मुली रडतात शील सांभाळायचं का इस्टेट सांभाळायची ?


                                                    वय माझे पाच हजार / २०