Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आता प्रलय यावा...

 असतो कोणी रंक आणि कुणा ठाव कोण राव कुणी लावून तूप मारतो खुशाल मिशीवर ताव भाकर तुकडा हाती नाही तर तूप हवे कशाला खुशाल ताणतो पाय, घेऊनी दगड एक उशाला

 आम्ही फूटपाथी! देहसापळा, कशास जागा हवी पाय दुमडून पोट खपाटी खुशाल दैवा टाळी द्यावी नाही ठाऊक देव कुणाचा का पापपुण्य धरून बसता देवाघरीच घुसखोर आम्ही जर मानवाचे काय पुसता

 निर्मिलेले प्राणी भक्षती, पाहून लीलया एकमेका हर्षे बनविला पूर्ण मानव, वाटला नाही कुणा धोका नाही उमगले आम्हा तेंव्हा कर्तृत्व दांडगे माणसाचे गावीही नव्हते आमुच्या त्याचे गुण गळे कापण्याचे

 दिग्मूढ दगडी देव राऊळी हताश होऊन बसले दुधातुपाने रोज न्हाऊनी गुन्हे बिनशर्त माफ केले नरबळी, भूकबळी वर कोवळी कळी हवस बळी प्रलयच हा उपाय, म्हणे विठुरायाची मूर्त सावळी

 केव्हापासून मी प्रलयाची वाट पहातोय....

 ---