या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वय माझे पाच हजार
माझे वय म्हणे पाच हजार वर्षे ! सांगू कसे मोजले असेल ते वय ड्रील करता मीच सोसले दुःख येशूचे गर्वाने मोजित वलये ते दाखले देती वयाचे
बीजातून जरा कुठं वर आलो असेन तेंव्हाच स्वतःभोवती मी हद्द आखली कधीच नाही मग मी मर्यादा सोडली माणसाने ना कधी माणुसकी बाळगली
फोफावली वाढ माणूस का त्रस्त झाला मज उखडण्या म्हणे तो रस्ता मधे आला देवापल्याड बुद्धी थोर तुझी की रे झाली घनदाट सावली तू क्षणात रखरखी केली
कोपऱ्यात बिचारे एकही नाही सोडले पोर थोर मानवा चालवली तू कुम्हाडीची कोर एकलकोंडा मी आता तुटला रे सारा परिवार चुकूनच झाले आज माझे वय पाच हजार
तीच माणसे त्याच करांनी करती मम सत्कार हासत वाहती आमचीच आम्हा फुले चार पण.... हृदयात सलते सोबत्यांची सर्द आठवण सर्दफुले ती जड हाती करतो त्यांना अर्पण १५ / वय माझे पाच हजार