पान:वय माझे पाच हजार.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अक्कल परवा कुणी हितचिंतक म्हणाला तुझी अक्कल गुडघ्यात आहे इतकं बर वाटलं म्हणून सांगू लगेच दोन नव्या knee कॅप्स चढवल्या....

कुठंही नजर टाकली तर सारे भाट गुलामगिरीचीच बुद्धी पूजा करणारे अरे ताटात नवा पदार्थ वाढलाय घ्या मोकळ्या मनाने चव तरी पण, बुद्धी गुडघ्यातच आहे, म्हटलं नीट पहावं मेंदूत बुद्धी ठेऊन करतात तरी काय ? कुणी वंदे मातरम् म्हटलं म्हणून जाळपोळ तर कुठे नाही म्हटलं म्हणून बोंबाबोंब कुठं गाय कापली म्हणून दोन चार मुडदे पाडा तर कुठे गाईची पूजा केली म्हणून सरकार पाडा उत्तम मेंदू बुद्धी वापरून कुठं बँक लुटा तर आमची धार्मिक, जातीय मेजॉरिटी म्हणून दगडं घालून दुकान फोडा, शाळा बंद पाडा गाडी समोर आले म्हणून ज्येष्ठांची थोबाडं फोडा मी अगदी हळुवार गुडघ्यावर हात थोपटला

म्हटलं बाबांनो अशीच इथंच सांभाळून ठेवा पाजळत..... डोक्यावर चढू देऊनच नका आपली आपली अक्कल