या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ते नको करू तसे होईल त्यापेक्षा प्राण खरा असावा हां! मनाचा बॉस प्राण ! म्हणूनच सावरकरानी प्राण तळमळला म्हटल मन तळमळलं नाही म्हटलं ! प्राण सदा शरीराबरोबरच रहातो मन सदा सैराट सुटलेलं ! म्हणूनच मनाला लगाम घाला म्हणतात होय ? मन भरकटलं मन विस्कटलं मन उदास झालं, विषण्ण झालं मन हादरलं! कधी प्रसन्न ही झालं !
दे उडवून मनाला! हं! आता जरा बरं वाटलं! कुणाला बरं वाटलं ? मनाला! --- १३ / वय माझे पाच हजार