पान:वय माझे पाच हजार.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विणले मनाचे जाळे

मनात हुरहूर कशाची?

भीती भविष्याची?

की उद्याच्या लढ्याची ?

की अजून न लढलेल्या

लढ्याच्या पराभवाची ? की भूत काळाच्या घोडचुकांची ज्याची अजून शिक्षाच नाही झाली ! मनाने स्वतःभोवती उभारलेल्या भिंती कोसळण्याची भीती स्वतःच स्वतःला अंधारात कोंडून पुन्हा अंधाराच्या बागुलबुवाची भीती की मनानेच बांधलेल्या किल्ल्यावरून कडेलोटाची भीती मनाबरोबर दोस्ती केली तेच चुकले!

मनात नुसते विचारांचे वादळ हे करू की ते करू हा चांगला, तो वाईट हा शहाणा तो मूर्ख हा मित्र म्हणून बरा तो शत्रू खतरनाक म्हणजे ऐकावे जनाचे करावे मनाचे हे चूक की काय ? म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे की काय ? मग हा श्रीहरी आणि कोण ? पाविजेतो स्वभावे म्हणे! हा कोण पावन करणारा ? सोडा मनाला मोकळे हे नको करू असे होईल वय माझे पाच हजार / १२