पान:वय माझे पाच हजार.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बिन माणसांचा देश का कुणास ठाऊक कधीही न भुंकणारी कुत्री चवताळून उठली रस्त्यावरून गुमान जाणाऱ्यांचे लचके तोडू लागली त्यांच्या पालकांनी साखळ्या केव्हाच मोकळ्या केल्या सोम्यागोम्यांनी दावा साधला छू... छू... करून कोवळ्या पोरीबाळींचा जीव मुठीत सैरावैरा धावत सुटल्या आता कुठलाही नर दिसला की त्या असंच करतात हल्ली छान उमललेली फुलं टवटवीत, झाडांवर दिसतच नाहीत कळ्या कुस्करायची मौजच वेगळी ऐकलंय कोंबडीपेक्षा एक दिवसाची पिल्लं फार चवदार असतात हे कलियुग संपणार केंव्हा ? सोन्याच्या भावानं भविष्य विकणारे सांगायला तयार नाहीत चलती...फक्त चलती सर्वांची रस्त्याच्या कडेला अंगाचं मुटकुळं करून खपाटी पोटानं मरायला सोकावलेल्याना सोडून --- ११ / वय माझे पाच हजार