या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
रिकामा देव्हारा एक दिवस उठलो, देव्हाऱ्यातले सगळे देव उचलले देव्हारा रिकामा केला सगळेच देव दाटीवाटीने मनाच्या गाभाऱ्यात ठेऊन दिले चला, रोज अंघोळ घाला देव्हारा पुसा देव पुसा गंध उगाळून लावा फुले वहा, निर्माल्य काढा सारेच कर्मकांड संपलेच की दोन दिवस मजेत गेले. लक्षात आला देवांचा गनिमी कावा देव काही कमी उपद्व्यापी नाहीत दूर देव्हाऱ्यातले देव अजूनच जवळ आले माझ्या बरोबरच अंघोळ करू लागले लोक माझी खोटी आरती करत त्यातच आपली हौस भागवू लागले इथं पर्यंत सारं ठीकच होतं गप्प बसावं की नाही... पण... आता मला वागायचं कसं ते पण तेच शिकवू लागले आई शप्पथ सांगतो माझ्या वागण्याला देवपण येतं की काय याची भीतीच बसली मित्र हो सांभाळा, आता देव वरून नाही तुमच्या जवळूनच बघतोय तुम्हाला... वय माझे पाच हजार / १०