Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ वनस्पतिविचार. [प्रकरण manmazanian पूर्णपणे लक्ष्यांत ठेविली असतां सहसा संयुक्त पानांची मोठी पत्रे व साधी पाने ह्यांतील फरक तात्काळ कळतो. बाहव्याचे पानांत पुष्कळ मोठी हिरवीगार पत्रे असतात व प्रत्येक पत्रास स्वतंत्र पान समजण्याचा संभव असतो. पण वरील कळीसंबंधी खूण ताडून पाहिली म्हणजे पानाची पत्रे तसेंच पाने हे लवकर लक्ष्यांत येते. "जोडीदार संयुक्त पाने:-( Pinnately compound leaves) बाभूळ, बाहवा, वाटाणे, शिरस, निंब, वगैरेमध्ये जोडीदार संयुक्त पाने आढळतात. कित्येक वेळां जोड्याचे शेवटी एकच पत्र मोकळे राहते. जसे:बकाणा. कांही पानांत सारख्या जोड्या असतात. जसें, लाजाळू, शमी, आवळा, इत्यादि. आवळ्याची पाने द्विसंयुक्त असतात. म्हणजे येथील पत्रेही जोडीदार असतात. गाजर, शोपा, धने, कॉसमॉस, शेवगा, वगैरे पाने त्रिसंयुक्त आढळतात. विलायती बाभळीची पाने दोन जोड्यांची व वाल, उडीद, बेल, क्लोव्हर वगैरे मधील पानें त्रिदली असतात. कधी कधी चार पत्रे असल्यामुळे चौपाती नांवाची वनस्पति पाहण्यांत येते. र संयुक्त हस्तसदृश पाने (Palmately Compound leaves)एका देठापासून पुष्कळ पत्रं जेव्हां हस्तसादृश्याने वर्तुलारुतीत येतात, तेव्हां त्या संयुक्त पानास संयुक्त हस्तसादृश पाने म्हणतात. जसें, गोरखचिंच, शेवरी वगैरे. शिरांची मांडणी ( Venation )-पांढ-या चाफ्याचे पान उन्हांत समोर धरिलें असतां शिरांची सरळ मांडणी सहज दिसते. जोडीदार शिरा मुख्य मध्य शिरेपासून निघून पुढे पोटशिरा जास्त वाढून एकमेकांत गुंततात. वाहव्याच्या पानांचं ह्या प्रकारे निरीक्षण केले असतां देठापासून सरळ वाढ. णाऱ्या मध्यशिरेवर बाजूस पुष्कळ पत्रं आल्यामुळे पत्रागणिक एक एक लहान मध्यशीर उत्पन्न होते. जेथे जेथें मुख्य मध्यशिरेपासून इतर पोटमध्यशिरांचा उगम असतो, तेथें तेथें पान संयुक्त असते व उलटपक्षी जेथे जेथें मध्यशीर एकच असून पोटमध्यशिरा नसतात, तेथे तेथें पान साधे असते. म्हणूनच चाफ्याचे पान साधे व बाहव्याचे पान संयुक्त असे समजण्यांत येते. गव्हांचे पानांत शिरा समांतर रेषेत आढळतात. वेळू, गुलछबू , तरवार, ऊस वगैर मव्ये शिरा समांतर जातीच्या असून वर्तुलारुति येतात. आंबा, चांफा, वड,