________________
६ वें]. quf Leaf. वांगी, वगैरेची पानें कांटेरी असतात. मखमल, समुद्रशोक, बाळकंद वगैरे पानावर लुसलुसीत मऊ लव येते. विलायती शेर, रासन, युकॅलिप्टस, कोभी वगैरे पाने चामड्यासारखी असतात. बिगोनीया, पानाचा ओवा, पानफुटी वगैरेची पाने मांसल असतात. ___ वर्ण:-पानांचे रंग नानाप्रकारचे आढळतात. नेहमींचा रंग हिरवा असतो. हा रंग पानामध्ये असणे अवश्य असते. कोवळी पानें तांबूस रंगाची असून पिकली म्हणजे ती पिवळट फिक्या रंगाची होतात. झाडे दुसन्या वृक्षाच्या सांवलीत वाढू लागली असतां सूर्य प्रकाश न मिळाल्यामुळे ती पिवळी रोगट दिसूं लागतात. कोटन् , अकॅलिफा, ट्रेडेस्कॅन्शीया, अरॉयडी वगैरेची पाने तांबड्या पिवळ्या टिपक्याची असतात. शोभेसाठी बागेत ही झाडे लावितात. तांबड्या भाज्या, रामदाणा, कॉक्सकांब, वगैरेमध्ये पाने लाल असतात. केवळ रंगावरून साधे अगर संयुक्त पान ओळखणे कठीण आहे. हे रंग दोन्ही प्रका. रच्या पानांत असतात. भेदः-साधी पाने व संयुक्त पाने ओळखण्यास फारसें कठीण पडूं नये; पण काही ठिकाणी साध्या पानासारखी संयुक्तपाने असल्यामुळे ओळखण्यात कठीण असते. जसे लिंबू, महाळुग, चकोत्रा, वगैरेमध्ये पाने दिसण्यांत साधी असतात; पण वास्तविक ती साधी नसून संयुक्त असतात. संयुक्त पानांत एकापेक्षा अधीक सांधे असतात, व त्या सांध्यावरून त्याची संयुक्तता व्यक्त होते, महाळुगाच्या पानास दोन सांधे असतात. एक सांधा जेथें पान सुरु होते त्या ठिकाणी असतो, व दुसरा सांथा देंठ पत्रास चिकटलें असतें त्या जागी असतो. साध्या पानास देंठाचे जागी सांधा नसून देंठापासून सरळ मध्यशीर वाढली असते. आतां संयुक्तपानांची पत्रे व साधी पाने ह्यांत अंतर कोणते असा प्रश्न विचारिला असतां पानांची व्याख्या पुनः सांगणे भाग पडेल. पानांच्या व्याख्येत ह्याविषयी पूर्ण भेद सांगितला असतो. खोडावरील हिरव्या रंगाची पसरती असादृश्य उपांगें म्हणजे पाने होत; व पानांचे पोटी कळी असणे अवश्य आहे. वाटाण्याची पाने संयुक्त कां, व आंब्यांची पाने साधी कां?वाटाण्याच्या पानास लहान लहान पत्रे असतात व आंबाच्या पानास एकच पत्र असते. शिवाय पत्राचे पोटौं कळी नसून मुख्य पानाचें पोटी कळी असते, ही गोष्ट ।