पान:वनस्पतीविचार.djvu/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ वनस्पतिविचार. [प्रकरण marrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr टाकण्याची नेहमी भाति असते. ततेंच सशक्त वनस्पति जीवनकलहांत क्षुद्रवनस्पतीस मागें टाकितात. सशक्त वनस्पतीसही वृक्षादनी ( Parastic) क्षुद्रवनस्पतिवर्गाकडून अथवा आळंबीवर्गाकडून भीति असते. लहान कीटक रोपे उगवतांना ते नाहीसे करून टाकतात. पुष्कळ प्राणी वनस्पतीस आपले भक्ष्य समजतात. इतक्या अडचणीमध्ये परिस्थित्यनुरूप ज्या वनस्पति वांचतील तेवढ्याच पुढे वंशवर्धन करितात. 'योग्यायोग्य । - व योग्याचीच संगोपना ही तत्त्वें वनस्पतिजीवनोत्कांतीमध्येसुद्धा आढळतात. उत्पत्तिकार्य स्खीपुरुषसंयोगामुळे उत्पन्न होणाऱ्या बीजाकडून होते; अथवा क्षुद्रवर्गातील विशिष्ट जननपेशींकडून ( Spore ) होते. तसेंच वनस्पतीच्या शरीरांतील काही भागांकडून म्हणजे कलमादिकांकडून उत्पत्ति होते. दुसऱ्या दोन्ही प्रकारांत स्त्रीपुरुषतत्त्वसंयोगाची जरूरी नसते. एकंदरीत उत्पत्तिकार्य फार महत्त्वाचे असून, जडपदार्थ व सजीव पदार्थ ह्यांमध्ये स्पष्ट भेद दर्शविणारे परमेश्वरी रुत्य आहे असे समजले पाहिजे. जडपदार्थापासून कधीही उत्पत्ति होत नाही. पण सजीव पदार्थात 'उत्पत्ति । हे अंतिम साध्य असते. कांहीं क्षुद्रवनस्पतींमध्ये उत्पत्तिकार्य साधे असते: किण्व (Yeast ) वनस्पति एकपेशीमय असून ती वाढत वाढत मोठी होते. तिची एक बाजू ज्यास्त फुगून तीस दोन वाटोळ्या पेशींसारखा आकार येतो. हा आकार येणे म्हणजे उत्पत्तिकायीस सुरुवात होणे होय, ही वाटोळी नवीन पेशी पूर्वीसारखी होऊन मळ पेशीपासून अलग होते. वाढ व उत्पत्ति ही सारखीच असतात. पण जेव्हां पेशी वेगळी होऊन स्वतंत्ररीतीने जीवनकार्ये करू लागते, तेव्हां उत्पत्ति झाली असें म्हणतात. कधी कधी ह्या वनस्पतींमध्ये सुद्धा स्त्रीपुरुषतत्त्वसंयोग होऊन उत्पत्तिकार्य घडत असते. पण अशी स्थिति विशेषेकरून पोषक द्रव्ये कमी असतांना दृष्टीस पडते. नाही तर साधारणपणे येथे 'कळी सोडून ' च ( Budding ) उत्पत्तिकार्य घडते. प्ल्यूरोकोकस् ( Pleurococcus ) नांवाची एक हिरवळ एकपेशीमय वनस्पति आहे. तिचा जीवनक्रम किण्व (Yeast) वनस्पतीपेक्षा अगदी वेगळा असतो. हवेंतून कॉर्बन वायु शोषण करण्याची शक्ति हरितरंजकामुळे तिजमध्ये असते. येथें पेशीमध्ये आडवा पडदा उत्पन्न होऊन एका पेशीचे