पान:वनस्पतीविचार.djvu/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ वें]. पुनरुत्पत्ति. २०५ दोन विभाग होतात, व पुढे याचप्रमाणे दोन्हींचे चार, चारचे आठ, भाठांचे सोळा असे ते वाढत जातात. तयार होणान्या पेशींत मूळ पेशीप्रमाणे केंद्र व पेशीमय द्रव्येही आढळतात. ह्या पेशी काही काल एकाच साधारण भित्तिकेंत राहून पुढे आपोआप वेगळ्या होऊन आपला स्वतंत्र व्यवहार सुरू करितात. येथें स्त्रीपुरुषतत्त्वसंयोगयुक्त उत्पत्ति आढळत नाही. ही वनस्पति हिरवळ शैवालवर्गीपैकी आहे. शैवालतंतूंत (Spirogyra) पुष्कळ पेशी एकास एक लागून त्यात सांखळीसारखा आकार येता. प्रत्येक पेशीत फिरकीदार हिरवे पट्टे असून, मधून मधून चमकणारी विशिष्ट जीवनशरीरें (Pyrenoids) असतात. येथे उत्पत्तिकार्य स्त्रीपुरुषतत्त्वसंयोगजन्य असते. दोन विशिष्टतंतु एकमेकांजवळ असल्यास परस्पर पेशीत उत्पत्तिभावना सुरू होऊन, परस्पर पेशींतन नळ्यांसारखे रस्ते उत्पन्न होऊन एकमेकांस भिडतात. ह्या वेळेस एका पेशीतील सर्व पेशितत्त्वें संकुचिन होऊन त्यांचा जणुं गोगा वनतो. हा गोळा अथवा संकुचित जीवनभाग त्या रस्त्यांतून खाली जाऊन तेथील केंद्राशी संयोग पावतो. वरील पेशी त्या वेळेस अगदी रिकामी होते, व खालील पेशीत दोन्हींची पोशद्रव्ये एकजीव होतात. येथेही पेशिद्रव्ये गोळ्यासारसी दिसतात. गर्भीकत भाग काही वेळ विश्रांति घेऊन पुनः पूर्ववत वादन त्यापासन धागे सुरू होतात. शैवालतंतूंस दोन तंतूंची जरूरी उत्पत्तिकार्यास लागते असे नाही, तर कधी कधी एकाच तंतूंतील जवळच्या पेशीमध्ये हे स्त्रीपुरुषसंयोगकार्य घडते. शेवालतंतूंपैकी प्रत्येक पेशी खरोखर स्वतंत्र वनस्पति आहे, असे म्हणण्यात हरकत नाही. कारण तंतूच्या पेशी अलग अलग जरी केल्या, तरी त्यांपासून वाढ होते. तसेच प्रत्येक पेशी दुसन्या जवळच्या पेशीस कोणत्याही प्रकारची मदत करीत नसते. इतर बहुपेशीमय वनस्पतींत प्रत्येक पेशी सर्वसाधारण वनस्पतीच्या जीवनकार्याकरिता आपला सर्व व्यवहार करिते. उच्च वनस्पतीमध्ये सर्व अवयवांचा उपयोग व्यक्तीच्या कल्याणाकरितां असतो. प्रत्येक अवयव स्वतंत्र कार्य करून त्याचा अंतिम हेतु एकजीवाप्रित्यर्थ असतो. ही गोष्ट शैवालतंतूंमध्ये विशेष लक्षात ठेविण्यासारखी आहे. ह्याच वर्गात मात्र अशाच प्रकारच्या काही तंतुमय वनस्पति आहेत.