पान:वनस्पतीविचार.djvu/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ वें]. पुनरुत्पत्ति. २०३ Komal Sambhudas Bot (चर्चा) १४:३६, २४ ऑगस्ट २०२० (IST) फांदी दुसऱ्या फांदीवर बसवून दोन्हींचा एकजीव करावा लागतो. तेव्हां दोन्हींमध्ये फरक कोठे राहिला? कलमांमध्ये फळे लवकर येऊ लागतात ह्याचे कारण असे आहे की, पूर्णावस्थेस पोंचलेल्या फांदीपासून नेहमी कलमें घेतात; त्यामुळे साहजिक पूर्णदशा पावलेल्या पक फांदीवर लवकर फुले येऊन फळे तयार होतात. पक फांद्यांचा ऋतुकाल अगोदर पूर्ण झाला असतो म्हणून त्यावर जननेंद्रिये लवकर यऊ लागतात; अर्थात् पुढे गर्भधारणा होऊन फळेही तयार होतात. ज्याप्रमाणे झाडांत कलमें करितात, त्याच प्रकारची कलमें पिकांमध्येही आढळतात. बटाटे शेतांत पेरून त्यांपासून बटाट्याची रोपडी नेहमी तयार करण्यांत येतात; ऊस लावावयाचा म्हणजे उसांची कांडी करून शेतांत परितात. रताळीही ह्याच प्रमाणे पेरितात. कांदा, लसूण, अळू वगैरेमध्ये हीच स्थिति असते. म्हणजे वरील सर्व ठिकाणी लहान लहान कोंब अथवा कळ्या पेरून त्यापासून दुसरी रोपे तयार करितात; अथवा ही एकप्रकारची विशिष्ट कलमेंच होत. येथेही स्त्रीपुरुषतत्त्वांचा संयोग होण्याची जरूरी नसते. प्रकरण २४ वें. पुनरुत्पत्ति. वनस्पतिवर्गाची वंशपरंपरा चालू राखणे हे त्यांच्या आयुष्यक्रमांतील एक मोठे महत्त्वाचे कार्य असते. आपल्या चरित्रांतील संकटांचा विचार केला असतां वंश कायम राखण्यास किती अडचणी येतात, याची कल्पना सहज होईल. तसेच त्यांचा जीवनकलह मोठा प्रतिस्पर्धेचा असून, त्यांतून ज्या वनस्पति टिकतात, त्याच पुढे आपलें वंशवर्धन करूं शकतात. शिवाय पूर्वी ज्या वनस्पति अस्तित्वात होत्या, त्या हल्ली दिसत नाहीत. पूर्वीच्या वनस्पतींना त्यांची परिस्थिति प्रतिकूल होत गेल्यामुळे हळूहळू त्यांचा वंश अजिबात नाहीसा झाला म्हणजे परिस्थितीस योग्य व जीवनकलहांत हार न जाणान्या वनस्पति केवळ अडचणी सोसूनही उत्पत्ति करूं शकतात. उच्च प्राणी क्षुद्र प्राण्यास खाऊन