पान:वनस्पतीविचार.djvu/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ वे]. पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश Calyx पुष्पमुगुट Corolla).१५३ '. कधी कधी पुष्पाधार इतक्या जोराने वाढतो की, फुलाचे पोटांतून तो धाहेर पडून त्याची लांब दांडी बनते व त्या दांडीवर पुन पाने वगैरे येतात. गुलाब अथवा तीळ ह्यांमध्ये ह्या-प्रकारे वाढलेला पुष्पाधार कधी कधी पाहण्यांत येतो. तिळवणीचे फुलांत पहिली दोन्ही वर्तुळे खाली राहून मधून पुष्पाधार देठासारखा वाढतो, व पुढे त्यावर पुंकेसर व स्त्रीकेसरदले येतात. अशा ठिकाणी पुष्पाधार अण्डाशयाचा देंठ बनून जातो. आंबा, लिंबु, सताप, वगैरेच्या फुलांत पुष्पाधार अण्डाशयास टेंकूसारखा उपयोगी पडतो. अशा ठिकाणी ह्याचा आकार वर्तुळाकृति अथवा वळ्यासारखा असतो. असल्या पुष्पाधारास कर्णिका ( disc ) म्हणतात. धने, ओवा, बडीशोपा, वगैरे फळांत पुष्पाधार जास्त वाढून त्यासच दोन्ही बाजूकडे स्त्रीकेसर दलें चिकटून प्रत्येकांत एक एक बीज आढळते. कधी कधी बीजांडाचा (ovales ) संबंध स्त्रीकेसर दलांशी न राहता ती केवळ पुष्पाधारावरच आढळतात. अशा वेळी पुष्पाधार नाळेसारखा उपयोगी पडतो. त्यांतूनच बीजांडास पोषक अन्नादि पदार्थ मिळतात. चंदन, पपया, वगैरे उदाहरणे ह्या जातीची आहेत. प्रकरण १८ वें, و قف पुष्पवाह्य वर्तुळे. (पुष्पकोश Calyx व पुष्पमुगुट Corolla). आतांपर्यंत फुलांचे सर्वसाधारण वर्णन करण्यांत आले. तसेंच पुष्पाधाराचाही उल्लेख करण्यांत आला. ह्या प्रकरणांत फुलांतील बाह्य वर्तुळाचे जरा विस्तारयुक्त वर्णन करण्याचा विचार आहे. - हरितदल वर्तुळ अथवा पुष्पकोश (Calyx.) हे वर्तुळ, फुलांतील बायांगास असून दलाचा रंग बहुतकरून हिरवा आढळतो. काही वेळां इतर रंगही पाहण्यांत येतात. तेव्हां पाकळ्या व सांकळ्या एकाच रंगाची असून ती परस्पर भिन्न ओळखण्यास कठीण जाते. जसें, सोनचाफा, लिली, वगैरे. कांदे, लसूण, गुलछबू वगैरे फुलांमध्ये आपणांस सहा पांढरी दले फुलांचे बाह्यांगांस आढळतात. ह्या सहा दलांपैकी तीन दले पहिल्या वर्तुळापैकी क