पान:वनस्पतीविचार.djvu/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ वनस्पतिविचार, [प्रकरण mmmmmmmmmrainrnmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm तीन दले दुसऱ्या वर्तुळापैकी असतात. अशा सादृश दलवर्तुळास पुष्पपरिकोश (Perianth) असें साधारण नांव दिले जातें, व नेहमा ह्याच नांवाने त्या दोन्ही वर्तुळास संबोधितात. जेव्हां फुलांत पुष्पकोशाचा अथवा पुष्पमुगुटाचा अभाव असतो, अशावेळी ह्याच नांवाचा उपयोग उरलेले एकटें बाह्यवर्तुळ संबोधण्यास करितात. जसें, एरंडी वगैरे. एरंडीमध्ये पुष्पमुगुटाचा अभाव असून केवळ बाह्यभागी पुष्पकोश आढळतो. ह्या पुष्पकोशास पुष्पवपरिकोश (Perianth) म्हणतात. त्याचप्रमाणे गुलबाक्षिच्या फुलांत पुष्पकोशाचा अभाव असतो, पण केवळ पांकळ्यांचें वर्तुळ असते. ह्यासही वरीलप्रमाणे पुष्पपरिकोश Perianth असें संबोधण्याची वहिवाट आहे. सांकळ्या कधी मुट्या तर कंधी संयुक्त असतात.मोहोरी,शिरस,मुळे वगैरेंच्या कुलांत ह्या सुट्या असून, कापूस, जास्वंद, तंबाखू, वांगी वगैरे फुलांतही संयुक्त असतात. गुलाबाचे फुलांतही दलें अगदी पानासारखी असतात-सांकच्यास पानांप्रमाणे मात्र कोठेही देंट असत नाही. दंलें सारख्या आकाराची असतां त्यास व्यवस्थित Regular म्हणतात. जसें रानजाई, व ह्याचे उलट अव्यवस्थित Irregular म्हणतात. जसें बाहवा, तरवड, संकासूर वगैरे. जेव्हां सांकळया सुट्या असतात,त्यावेळेस त्या किती आहेत, हे सहज मोजितां येते. पण जेव्हां त्या संयुक्त असतात त्यावेळेस पूर्णपणे त्यांची संख्या ओळखण्यास संयोगावर अवलंबून असते. काहींमध्ये संयोग बुडाशी असून टोकाकडे दंले मुटी असतात. अथवा संयोग मध्यभागापर्यंतं असून अयांकडील भाग मोकळा राहतो. पण जेव्हां संयोग पूर्ण होऊत दलांचा जणूं एक प्याली अथवा नळी बनते, तेव्हां मात्र त्यांची संख्या ओळखणे कठीण होते. त्यावर किती मध्यशिरा आहेत, हे नीटं पाहून त्यांची संख्या सहज सांगता येणार आहे. कारण प्रत्येक दलास मध्यशीर असते म्हणून मध्यशिरेच्या संख्येप्रमाणे ती दले आहेत असें अनुमान काढणे चुकीचे होणार नाही. _संयोग कधी सारखा असतो; अगर वांकडा तिकडा अव्यवस्थित असतो. व्यवस्थित अगर अव्यवस्थित संयोगाप्रमाणे वर्तुळास वेगवेगळे आकार येतात. कोनारुति, ओष्ठाति, घटारुति वगैरे आकार नेहमी आढळतात. ह्याचप्रकारचे ।