Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वें]. शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वास क्रिया. ११५ प्रकरण १४ वें. शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छासक्रिया. colorमागील प्रकरणी सांगिल्याप्रमाणे वनस्पति मुळांतून निरिंद्रिय द्रव्ये शोषण करून पुढे पानांत त्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार करिते. त्याचप्रमाणे नायटोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ वनस्पतिशरीरांत तयार होतात. जरूर लागणारे नायटिक आम्ल अथवा गंधकी आम्ल क्षारापासून वनस्पतिशरीरांत बनते. हे चार मुद्धां मुळांतून शोषिले जातात. पुष्कळ वेळां कार्बन वायु वनस्पातखायांपैकी मुख्य आहे असे वाटण्याचा संभव आहे. पण नुसता कार्बन वायु वनस्पतीस उपयोगी पडत नाही. जेव्हां वनस्पतीचें बीजस्थितीपासून जनन होत असते, अशा वेळेस बीजाभोवती कार्यन् वायूचे जणूं वेष्टण झाले असते, पण ह्या कार्बन वायूचा किंचित् ही उपयोग बीजास नसतो. त्या वेळचे बजिाचें खाद्य म्हणजे बीजामध्ये सांठविलेलें सेंद्रिय पदार्थ असतात, तेच होय. जर ह्या सांठविलेल्या पदार्थाचा बीजास उपयोग करूं दिला नाही, तर मोड उपाशी मरून जाईल. ज्या वनस्पतीमध्ये हरितवर्ण नसतो, त्या वनस्पतीस कार्बन वायूचा उपयोग नसतो. तसेंच हिरव्या वनस्पतीस कार्बन वायु प्रकाश नसतांनां मिळत असला, तर त्या कार्बन वायूचा फायदा वनस्पतीस न होता उलट नुकसान होण्याचा संभव असतो. म्हणून जे पदाथ अथवा जे वायू वनस्पति सजीवतत्वास मोकळ्या स्थितीत मिळाले असतां त्यापासून पोषण कार्य घडते, त्यासच वनस्पतीचें खाद्य म्हटले असतां चालेल. शिवाय हिरवट वनस्पति आपले अन्न शोषून घेतात, असे म्हणता येणार नाही. तर अन्ने तयार करण्यास जी द्रव्ये लागतात, ती द्रव्ये वनस्पति शोषून घेतात. या शोषित द्रव्यावर वनस्पति-शरीरांत विशिष्ट कार्य घडून वनस्पतीचे खरें अन्न तयार होते, ज्या वनस्पतीत हरितवर्ण कण नसतात, त्या वनस्पतीस आपलें अन्न तयार-स्थितीत बाह्य वस्तूंत शोपणे जरूर असते. आता पुष्कळ वनस्पति