पान:वनस्पतीविचार.djvu/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वें]. क्षार, कार्बन्वायु व हारत्वर्ण शरीरें. १०७ आगमन होते, तसेच पानांतून फाजील पाण्याची वाफ होऊन हवेत ती कशी मिसळते व त्या योगाने पुनः नवीन पाणी कसें जोराने चढते, ह्याचा विचार पूर्वी झाला आहे. आतां पौष्टिक वायु वनस्पतिशरीरांत कसे शिरतात व पुढे त्यांपासून कोणती कार्ये घडतात, वगैरे गोष्टींचा विचार अजून व्हावयाचा आहे. खरोखर पाणी व अन्नशोषण जितकें कठीण व त्रासदायक असते, तितकें वायुशोषण कठीण नाही.. वनस्पतीची महत्त्वाची पौष्टिक आम्लें म्हणजे कार्बन व नायट्रिक आम्लें होत. पानांतील हिरवळ पेशीजालांत कार्बन वायूपासून आम्ल झाल्याशिवाय तो तो वायु वनस्पतसि निरुपयोगी असतो. त्याकरितां पानांत पाण्याचा एक थर अलग असतो. बाह्यत्वचेखाली आंतील अंगास हा थर असतो. हरित्वर्ण शरीरांकडून हवेतून कार्बन वायूचे शोषण होते. कार्बन वायु त्वचारंध्रांतून आंत शिरल्यानंतर पाण्याचे थराशी मिळून त्यापासून कार्बन माम्ल तयार होते. हे आम्ल पुढे हरितवर्ण पेशीजालाकडे जाऊन मुळांतून शोषिलेलें प्राणी व निरिंद्रिय पदार्थ, यांशी रासायनिक संयोग होऊन त्यापासून इच्छित ऐंद्रिय पदार्थ तयार होतात. हरितवर्ण शरीराकडून ह्या कार्वन् आम्लाचे विघटीकरण सूर्यप्रकाशांत होते, व विघटीकरण स्थितीत रासायनिक संयोग पावून ऐंद्रिय वस्तु तयार होतात. म्हणूनच ऐंद्रिय पदार्थ बनविण्यास सूर्य. प्रकाशाची अत्यंत जरूरी असते. गर्द छायेमध्ये अथवा अंधारांत हरित्वर्ण शरीराकडून कार्बन वायु आकर्षिला जात नाही, अथवा त्याचे विघटीकरणही होत नाही. म्हणून ही दोन्ही काय होण्यास सूर्यप्रकाश हवा असतो. बाष्पीभवनास जशी सूर्यप्रकाशाची जरूरी असते, तद्वतच कार्बन वायूचे शोषण अथवा विघटीकरण यास प्रकाशाची जरूरी असते. म्हणून ऐंद्रियपदार्थ बनणे तसेंच बाष्पीभवन होणे, ही दोन्ही कार्य दिवसाउजेडी घडत असतात. शिवाय बाष्पीभवनापासून जितकें अधिक निरिंद्रिय द्रव्यमिश्रित पाणी हरितपेशीजालांत येईल, तितक्या अधिक प्रमाणांत त्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार होतील. सेंद्रिय पदार्थ खरोखर वनस्पतींची खायें आहेत. खायें तयार करण्याचे काम दिवसा प्रकाशांत चालत असते. रात्रीच्या वेळी बाष्पीभवन तसेच सेंद्रिय पदार्थ बनणे ही दोन्ही कार्य बंद असतात.