पान:वनस्पतीविचार.djvu/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतिविचार... [प्रकरणः awwanimanawwwimwww झाल्यामुळे देंठ ज्या ठिकाणी डहाळीशी चिकटलेला असतो, त्या ठिकाणच्या पेशी फाटू लागतात. पेशीतील ऐंद्रिय आम्लें पेशिभित्तिका विरघळवून फाडण्याचे कामी मदत करितात. होतां होतां डहाळीचा संबंध अगदी तुटून जातो. मग आकस्मिक वारा अथवा दुसरें अन्य कारण यामुळे तें पान सहज गळून जाते. पाने गळण्यापूर्वी ही पूर्वतयारी झाली पाहिजे; नाही तर पार्ने सहज गळत नाहीत. मुद्दाम एखादेवेळेस मोडकी फांदी अथवा मोडकी पार्ने झाडावर ठेवावीत. ती वान्यामुळे सहसा गळत नाहीत. त्यापेक्षां आपोआप गळणारी पाने लवकर पडतात. शिवाय गळलेली पानें तपासिली असतां, जणूं व्यवस्थितपणे ती चाकूनें इतर भागास न दुखवितां कापिली असावीत असे वाटते. पाने गळण्यापासून बाष्पीभवन कमी करण्याव्यतिरिक्त दुसरा एक फायदा वनस्पतीस मिळतो, व तोही पहिल्या इतकाच महत्त्वाचा असतो. मुळांतून पुष्कळ निरिंद्रिय द्रव्ये पानामध्ये रसाबरोबर येतात. वनस्पतसि निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याकरितां गुदद्वारातारखी विसर्जन अंगें नसल्यामुळे जी निरुपयोगी निरिंद्रिय द्रव्ये पानांत सांठतात, त्यांचे विसर्जन पाने गळल्याने पूर्ण होते. नाही तर असल्या निरुपयोगी द्रव्यांच्या भाराने पानें वांकून जातील व आपले कर्तव्य करण्यास चुकतील. तेव्हां अशाचे लवकर विसर्जन होणे फायदेशीर असते. सालीचे विसर्जन ह्याच त-हेचे फायदेशीर होते. प्रकरण १३ वें. क्षार, कार्बन्वायु व हरितवर्ण शरीरें. فهی पुष्कळवळां सांगण्यात आले आहे की, श्रमविभागाचे तत्त्व वनस्पति. जीवनचरित्रांत नेहमी आढळते. काही पेशीनी अन्न व पाणी मिळवावें, कांहींनी पौष्टिक वायु शोषण करावा, काहींनी त्यांची योग्य जागी ने-आण करून त्यापासून ऐंद्रिय पदार्थ बनवावेत, तसेच ज्या ठिकाणी त्या ऍट्रिय वस्तूंची जरुरी असेल, त्या ठिकाणी पोचविण्याची तजवीज करावी. पाणी व निरिद्रिय पदार्थ जमिनीतून कसे शोषिले जातात, व त्यांचे पानांत कसे