पान:वनस्पतीविचार.djvu/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ वनस्पतिविचार. [प्रकरण . पाण्यांतून उगवणारी झाडे पाण्यातूनच कार्बन आम्लाचे शोषण करितात. त्यासही सूर्यप्रकाशाची जरूरी असते. बाह्यत्वचेच्या भित्तिका पातळ असल्यामुळे कार्बन आम्लास आत शिरण्यास सुलभ पडते. पाणवनस्पति आपल्या शरीराच्या वाटेल त्या भागांतून पाण्याच्या साहाय्याने वायु अथवा घनद्रव्ये विरघळलेल्या स्थितीत शोषण करूं शकतात. ही द्रव्ये व पाणी मुळांतूनच शोषिली पाहिजेत असा निर्बंध नाही. ज्या वनस्पतीची मुळे जमिनीत शिरून कोंब हवेत वाढतात, अशामध्ये श्रमविभाग स्पष्ट असतो. जमिनीतून निरिंद्रिय द्रव्ये पाण्याबरोबर मुळांच्या द्वारे घेतली जातात; पण पाने अथवा पानांसारखे हिरवे भाग यांकडून वायु शोषिले जातात. येथे दोन्ही, मुळ्यांची व पानांची, कामे एकाच भागांत होत नाहीत. प्रयोगांती असें सिद्ध झाले आहे की, पोटॅशियम, मॅग्रेशियम, कॅलशियम व लोह ह्या चार धातु कोणत्या ना कोणत्या प्रमाणांत जमिनीत असल्या पाहिजेत. कारण, त्यांशिवाय वनस्पतीची वाढ चांगली होत नाही. ह्या धातु आवश्यक आहेत खन्या, पण त्यांचे अस्तित्व वनस्पतिशरीरांत केवळ धातु असे आढळणार नाही. पण निरनिराळ्या रूपांत म्हणजे आम्हें अथवा क्षार ह्या स्थितीत त्या सांपडतील. शिवाय ह्या धातूचा अमुक एक भाग अमुक एक उपयोगाचा आहे, असे सांगता येणार नाही. पण त्यांचा प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष उपयोग असतो यात संशय नाही. ज्या जमिनीत लोखंडाचा अंश बिलकुल नाही, त्या जमिनीत बी पेरिले असतां ते उगवून त्यापासून चांगला रोपा तयार होत नाही. पाणी किंवा इतर द्रव्ये जमिनीत पुष्कळ असली, तथापि आवश्यक लागणा-या लोखंडाच्या अंशाखेरीज वनस्पतीमध्ये जोम येत नाही. पानांत असणारी हरिद्वर्ण शरीरें लोखंडाच्या अभावामुळे तयार होणार नाहीत. खरोखर हरिद्वर्ण शरीरे तपासून पाहिली, तरी त्यांत लोखंडी अंश यकिचितही नसतो; पण तो असल्याखेरीज हरिद्वर्ण शरीर बनत नाहीत. म्हणजे ही शरीरें बनण्यांत काही तरी लोखंडाचा अप्रत्यक्ष उपयोग होत असतो. हे कसें होतें वगैरेसंबंधाने अजून आपले अज्ञान कायम आहे. असा एखादा दिवस येईल की, ह्या सर्व गोष्टींचाही उलगडा होऊन जाईल. पूर्वी ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यांपैकी बऱ्याच प्रस्तुतकाली माहीत झाल्या आहेत. नेहमी प्रयोग व तत्संबंधी विचार चालले पाहिजेत. लोखंडाच्या अभावें हिरवा रंग न झाल्या