________________
१२ वें]. वाष्पीभवन (Transpiration.) ९९ म्हणजे ते कोरडे होते. धोतराचे अंगांत ते लवकर वाळावें अथवा ते लवकर न वाळतां पुष्कळ वेळ तसेंच ओले रहावे, ह्यासंबंधी व्यवस्था करण्याची कमी अधिक शक्ति नसते. कारण बोलून चालून ते पडलें निर्जीव; पण सजीव वनस्पतीचे तसे नसते. वाफ का अधिक होऊ देणे. अथवा पाण्याचा सांटा कमी असेल तर फारशी वाफ होऊ न देतां ते पाणी पुष्कळ दिवस पुरविणे, अथवा जास्त पाणी असले तर त्याची अधिक वाफ करून हवेत सोडणे, वगैरे बाष्पीभवनांतील गोष्टी वनस्पति निर्जीव नसल्याची साक्ष पटवितात. म्हणजे बाष्पीभवनावर अंमल करणारी शक्ति वनस्पतिशरीरांत असून ती आपले इच्छेनुरूप परिस्थिति लक्षात घेऊन बाष्पीभवन कमी अधिक होऊ देते, कारण ह्या बाष्पीभवनाचा परिणाम त्या वनस्पतीच्या -जीवनचरित्रावर होत असल्यामुळे त्यास निराळे स्वरूप आलेले असते. बाकी वाफ होऊन हवेत मिसळणे हे साध्या बाष्पीभवनांत तसेच वनस्पति-बाष्पीभवनांत सारखेच असते. एकावर अंमल करणारी शक्ति असल्यामुळे ती वाफ करण्याची साधनें कमी अधिक करून बाष्पीभवनावर आपला अंमल गाजविते; पण दुसन्यांत ती शक्ति नसल्यामुळे परिस्थितीचा अंमल उलट तिजवर चालतो. एका लहानशा भांड्यांत काही मिश्रित पाणी उन्हांत ठेविलें असतां बाप्पी भवन सुरू होते. मिश्र वस्तूपैकी ज्या वस्तू पाण्याचे बाष्पीभवनाबरोबर हवेत जाण्यासारख्या असतात, त्या पाण्याबरोबर वाफ होऊन हवेत मिसळतात, व बाकी उरलेले मिश्रण जास्त घन हात. तसेच त्या घन रसांत शोषण शक्ति उत्पन्न होते. पाण्यात साखर, नायाट्रिक, सल्फ्यूरिक तसेंच फॉस्परिक आम्लें यांचे सूक्ष्म प्रमाण मिसळून उथळ भांड्यांत वरीलप्रमाणे हळू हळू सूर्यप्रकाशांत बाष्पीभवन होऊ दिले असतां खाली भांड्यांत घन रस राहतो, व ह्या धनरसाच्या अंगी आपल सभोवतालचे पदार्थातून पाणी शोषून घेण्याची शक्ति उत्पन्न होते. ह्याच तत्त्वानुसार वनस्पतीच्या बाह्य पेशीतून हवेत बाष्पीभवन होऊन पेशींतील द्रवरस घन होतो, व जवळच्या पेशीतून पुनः पाणी शोषून घेण्याची शाक्त त्या घनरसांत उत्पन्न होते. दोन पेशीत सारख्या घनतेचे पाणी असून एका पेशीतून पाण्याची वाफ होऊन हवेत जाऊ लागेल