पान:वनस्पतीविचार.djvu/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० . वनस्पतिविचार, [प्रकरण mmwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww तर त्या दोन्ही पेशीतील घनतेचे समत्व कधीही कायम टिकणार नाही. थोडा अधिक फरक त्या दोहोंत पडणारच. आपण अशी कल्पना करूं की, एकावर एक पेशी सारख्या रचिल्या असून त्यास सांखळीसारखा आकार आला आहे. तसेच सर्व पेशीमध्ये सारख्या घनतेचा रस खेळत आहे. ह्यांपैकी डोक्यावरील एक पेशी जर हवेकडे उघडी असली तर त्यांतून रसाचे बाष्पीभवन होऊन वाफ हवेत मिसळत जाईल. बाष्पीभवनामुळे त्या पेशींतील रस घन होईल. पण त्याबरोबरच खालील पेशीतून रसाचे आकर्षण होऊ लागेल. हा रस वर गेल्यामुळे तेथेही त्यास घनत्व मिळन तिस-या पेशीरसावर त्याचा परिणाम होईल. याप्रमाणे पेशीपासून पेशीत घनत्व उत्पन्न होऊन सर्वांत खाली. असणाऱ्या पशीतही रस घन होईल, व एकप्रकारचा खालून वर जाणारा सारखा प्रवाह सुरू होईल. अशा प्रकारचा रसप्रवाह बाष्पीभवनामुळे खालून वर जाणारा वनस्पति-शरीरामध्ये दृष्टीस पडतो. जमिनीतून शोषिलेले पाणी प्रत्येक पेशीतून खालून सारखे वर चढत जाते. ह्या प्रवाहाचा उगम खरोखर मुळ्यावरील केसांत होऊन, अखेर पानांतील उघड्या तोंडाच्या पेशीत होते, असे म्हटले तरी चालेल, अशा प्रकारचा वर जाणारा प्रवाह काष्ठवाहिन्यांतून वर पानापर्यंत चढत जातो. खोडाच्या काष्ठवाहिन्याचा संबंध पानांतील शिरांशी असल्यामुळे खोडांतून पानाच्या शिरांत तो प्रवाह येतो. वाहिन्या अरुंद असल्यामुळे रस लवकर वर चढण्यास सोपे पडते. काष्ठवाहिन्या, खाचेदार, मळसूत्री अथवा वळेदार असल्यामुळे त्यांतून जाणारा रस सारखा खालून वर चढतो. रसवाहिन्यामध्ये जीवन कण नसून त्यांत प्रवाह कमी अधिक मोठा करण्यास उपयोगी पडणारे पडद ( Valves ) मात्र असतात. प्रवाह काष्ठांतून वर जातो. ह्या संबंधाचे पुष्कळ प्रयोग झाले आहेत व प्रत्येकांत तेंच तत्त्व सिद्ध झाले आहे. खोडावरील साल इंचभर जागेची काढून टाकिली तरी वर जाणारा प्रवाह ह्यामुळे थांबत नाही. तो पूर्वीप्रमाणेच सारखा वर जात असतो. तसेच जेथें तो प्रवाह पोहोचतो ती पाने सुद्धा पूर्वीसारखी घट्ट व चिवट राहतात. प्रवाह जर पोहोचला नसता तर, पाने सुकी पडली असती. आतां केवळ साल ( Cortex ) न कापतां काष्ठपदर त्याबरोबरच जर कापून टाकिले, तर मात्र वर जाणारा प्रवाह ताबडतोब बंद होऊन वरील पाने गळल्यासारखी होतील. यावरून असे सिद्ध ठरतें की, बाह्यत्वचा