________________
९८ 22 वनस्पतिविचार. [प्रकरण । वर्षाचे सर्व ऋतूंत अथवा एका दिवसाचे सर्ववेळी मुळ्या आपले शोषणकाम सारख्या वेगाने चालवितात, असें नाहीं; कांहीं ऋतूंत अथवा दिवसाचे काही विशिष्टवेळी ते काम जोराने चालते; तसेच उलटपक्षी काही वेळी तें मंद अथवा अगदी शिथिल होतें. ह्याच फरकामुळे एका विशिष्ट ऋतूंत झाडांची वाढ मुळी होत नाही. कारण त्यावेळी मुळ्या आपले शोषण• काम फारच मंदरीतीने चालवितात. आतां असें कां होते, ह्याचे समर्पक उत्तर देणे फार कठीण आहे, व अजून त्यासंबंधी फारसे शोध झाले नाहीत. दिवसा व रात्री प्रकाश भिन्न भिन्न असल्यामुळे अथवा वषांचे ऋतूंत सारखा सूर्यप्रकाश नसल्यामुळे, त्याचा परिणाम मुळ्याच्या शोषक क्रियेवर होत असेल असे वाटते. कोवळेपणी शोषकपणामध्ये प्रकाशभिन्नत्वामुळे दिसणारा फरक फारसा आढळत नाही; पण जसा जसा जुनेपणा झाडांस येत जातो, त्याबरोबर हा फरकही दिसू लागतो. प्रकरण १२ वें. बाष्पीभवन. (Transpiration.) पाण्याची वाफ होऊन सभोवतालच्या हवेत मिसळणे हा बाष्पीभवनाचा नेहमींचा अर्थ होय. वनस्पतिशरीरांत ज्या पेशींचा हवेशी संबंध येतो; त्या पेशींतून शरीरांत खेळणाऱ्या पाण्याची वाफ होऊन जेव्हां ती शरीराबरोबर हवेशी मिसळते, त्यांसच वनस्पतीचे बाष्पीभवन म्हणतात. साधे बाप्पीभवन व वनस्पति-बाष्पीभवन ह्यांत फरक असतो. कारण एकाचा जीवनचरित्रावर कोणताही परिणाम होत नसून, केवळ पाण्याचे बिंदू बाष्परूप पावून हवेत मिसळतात. जसें ओलें धोतर हवेत धरिले असतां कांही वेळाने त्यांतील पाण्याचे कण धोतरांतून उडून हवेत मिसळतात, व आपोआप ते कोरडे होत जाते, अथवा हवेतील उष्णतेमुळे धोतरांतील पाण्याची वाफ होऊन ती वाफ हवेत मिसळून जाते व धोतर कोरडे होतें. धोतर निर्जीव वस्तू असून ती कोरडी झाली एवढीच किया कायती ह्या साध्या बाष्पीभवनामुळे घडली. उन्हांत धोतर सारखे ठेविलें