पान:वनस्पतीविचार.djvu/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११वें]. ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शाक्त (Root pressure). ९७ बाष्पीभवन कमी असते, म्हणजे एकंदरीत या दोन्ही क्रिया परस्पर विरोध वेळेत चालतात, असे म्हटले असतां चालेल. मुळाच्या शोषक क्रियेस ऑक्सिजन वायूचीही जरूरी असते. जेव्हां मुळ्यांस पूर्ण स्वच्छ हवा मिळत असते, अशावेळेस त्यांची शोषक क्रिया जोराने चालू राहते, पण स्वच्छ हवेच्या अभावी ती क्रिया मंद होते. म्हणूनच शेतकरी जमीन नांगरून पूर्ण रंधमय करून टाकितो. त्यामुळे जमिनीत घसणान्या मुळ्यांस त्या रंध्नांतून स्वच्छ हवा मिळून ती आपले अन्न शोषण कर. ण्याचे काम उत्तम करितात. - जमिनीतील वारांच्या प्रमाणावरही मुळाची शोषकक्रिया अवलंबून असते. जसें जामिनीत मीठ पुष्कळ असले तर तेथील पाणी बहुतेक खारट असन मुळांत शिरण्या ऐवजी मुळांतील पाणी कधी कधी बाहेर जाऊं लागते. जेव्हां वनस्पति लहान व कोवळी असते, त्यावेळेस तीस जरूर लागणारे पाणी व इतर पौष्टिक पदार्थ थोड्या प्रमाणांत पुरतात; पण जसे जसें ती वनस्पति वाढू लागते, त्या प्रमाणांत तिच्या गरजा अधिक वाढत जातात. कोवळेपणी मुख्य मुळांवरील केस अन्न शोषण करण्याचे काम करीत असतात, पण जेव्हां जून स्थिति येत जाते. त्यावेळेस केसांची जागा मोठी विस्तृत अस. ण्याची जरूरी असते. म्हणूनच मुख्य मुळापासून पुष्कळ पोटफांद्याच्या अग्रा-जवळ नवीन नवीन केस येतात. हे सर्व केंस आपले शोषणकाम करीत असल्यामुळे वनस्पतींच्या वाढत्या गरजा भागतात. नाहीतर अन्नशोषण कमी होऊन अन्नाचा खर्च जेव्हां जास्त होऊ लागतो, त्यावेळेस झाडास ओढती लागली असे म्हणतात. ह्या ओढतीचा वनस्पतीच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. प्रत्येक केस आपल्या विशिष्ट जागेत शोषणाचे काम करीत असतो, व ह्या रीतीने जेव्हां सर्व केस आपल्या कामांत गुंतले असतात, त्यावेळेस जमिनीची किती जागा त्याचे आकर्षण-अंमलाखाली येते, ह्याची कल्पना सहज करितां येणार आहे. जमिनीच्या खरखरीत कणांशी केंसाचा संबंध असल्यामुळे ते लवकर झिजन शोषणाचे कामांस निरूपयोगी होतात; पण सजीवतत्त्व त्यांचे ऐवजी नवीन केंस उत्पन्न करण्याची सोय करून शोषण कामात अडथळा होऊ देत नाही.