पान:वनस्पतीविचार.djvu/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ वनस्पतिविचार, [प्रकरण wwwwwwwwwwwwwwwwwwwww जास्त ग्रंथींचा भरणा असतो. प्रत्येक ग्रंथीसभोवती जाड कातडीच्या पेशी, म्यान असते. जाड कातडीच्या पेशीचा रंग पिवळट किंवा तांबुस असतो. ग्रंथीमध्ये काष्ठ (Xylem ) व तंतुकाष्ठ P(hloem) असून संवर्धक पदराचा अभाव असतो. काष्ठवाहिन्या चार असून पैकी फिरकीदार एक व वळेदार एक अशा दोन वाहिन्या प्रथमकाष्ठांत (Protoxylem) असून दुसऱ्या दोन खाचेदार बाह्यांक गाकडे असतात. वाहिन्या सोडून काष्ठाची मध्य जागा बहुतेक काष्ठतंतूनी भरलेली असते. काष्ठाचा आकार इंग्रजी V अक्षरासारखा असून निमूळतें टोंक मध्यभागाकडे असते. वरील रुंद व्हीच्या पोकळीत तंतुकाष्ठ चाळणीदार वाहिन्या व प्रथमतंतुकाष्ठ (Protophleem ) असतात. जसा आडवा भाग कापून वरील सर्व पदर दिसतात, तद्वतच उभा सरळ भाग कापिला असतां ते सर्व दघि स्थितीत अढळतात. बाकी इतर फरक नसतो. ग्रंथीमध्ये संवर्धक प्रदर अथवा अंतरालसंवर्धक पदर आढळत नसून त्यामुळे खोडाची रुंदी वाढत नाही; परंतु नारळ, ताड वगैरे झाडे एकदलधान्यवर्गीपैकी असुन त्यांचा बुंधा बराच मोठा व रुंद असतो. अथवा मक्याचे खोडसुद्धा कोवळ्या स्थितीपेक्षा जुन्या स्थितीत आपल्या मानाने रुंद व मोठे होत असते. जर असल्या खोडांची द्वितीय वाढ (Secondary Growth) संवर्धक पदराच्या अभावामुळे होत नसते, तर ही रुंदी व जाडी कोठून आली असा साहजिक प्रश्न उत्पन्न होतो. स्ट्रॉस बरगर साहेबाचें असें म्हणणे आहे की, पूर्वी असलेल्या सालीतील पेशी अधिक ताणल्या जाऊन मोठ्या फुगतात, त्यामुळे खोडासही द्वितीय वाढ आली आहे असे वाटते. शिवाय अग्राकडील वाढ प्राथमिक स्थितीत अति जोराची असून पुष्कळ पेशी उत्पन्न होतात. ह्या पेशीमुळे नवीन कांडी व अंतरकांडी जास्त रुंदीची होतात. तसेंच खोडास उलट्या शंकूसारखा आकार येतो. पण पुढे लवकरच सारखी वाढ होऊन उभा सरळ सोट बनतो. घायपात, दर्शना वगैरेमध्ये खोडाची रुंदी दरवर्षी थोडी आधिक वाढते. ही रुंदी ग्रंथीच्या संवर्धक पदरामुळे नघून स्तंभाच्या बाह्यांगांत म्हणजे परिवर्तुळामध्ये कांही पदर संवर्धक होऊन नवीन ग्रंथी उत्पन्न होतात, व त्यामुलें खोड थोडे आधिक वाढत जाते. दर्शनाच्या ग्रंथीमध्ये मध्यभागी तंतकाष्ठ असून सभोवती काष्ठाचें वेष्टण असते.