पान:वनस्पतीविचार.djvu/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें.] अंतररचना. एखादे वेळेस एका वर्षात दोन वर्तुळे पडतात. कारण, त्या वर्षांत दोन ऋतूंमध्ये संवर्धक शक्ति मंद होऊन पुनः जोराने सुरू होते. कच्च्या लाकडांपेक्षा जुन्या लांकडाचा रंगही वयाधिक मानाने पालटत जातो. ही वर्तुळे हिरवल झाडापेक्षा मोठमोठ्या वृक्षांत चांगली स्पष्ट असतात. ह्याचे कारण मोठे वृक्ष पुष्कळ वर्षे टिकून त्यांत वर्षाचे वर्षास नवीन नवीन वर्तुळे तयार होतात, त्यामुळे जुनी वर्तुळे जवळ जवळ आंत खेचिली जाऊन बाहेरील अंगास स्पष्ट व मोठी वर्तुळे आढळतात. हिरवळ खोड नाजूक असून बहुतेक वर्षमरच टिकण्याजोगे असते. सूर्यकमलांत असली वर्तुळे असत नाहीत; कारण त्याचे खोड वार्षिक असते. ____ एकदलधान्य वनस्पतीची रचना पाहण्याकरितां मक्याचे खोड पसंत करावें. ताजे खोड अथवा स्पिरिटमध्ये ठेविलेले तुकडे ही दोन्ही सारखी उपयोगी पडतात. साधारणपणे मध्यम आकाराचे खोड कापण्यास घ्यावे, म्हणजे त्यामर्ये वाहिनीमयग्रंथी स्पष्ट पाहण्यास मिळतात. १ उपरित्वचः प्रथम आढळते. पेशी काहीशा वांकड्या तिकड्या असून जाड कातडीच्या असतात. उपरीत्वचेमध्ये त्वचारधे पुष्कळ वेळां दृष्टीस पडतात. ____२ उपरीत्वचा अथवा बाह्यत्वचा झाल्यावर साल ( Cortex) दिसते. सालीत पदर दोन तीन असून पेशी पिंगट रंगाच्या व जाड कातडीच्या आढळतात. अंतरत्वचा (Endodermis) परिवर्तुळ वगैरे स्पष्ट दिसत नाहीत मुदसम परिमाण पेशीजाले ( Parenchymatous ground tissue ) पुष्कळ असून सर्व खोडाचा मध्य भाग त्यांनीच भरलेला असतो, वाहिनीमय ग्रंथी पुष्कळ असून त्या समपरिमाणी पेशी जालांत जणूं बुडालेल्या असतात, समपरिमाण पेशी सतेज असून जीवनकणांनी पूर्ण भरलेल्या असतात. बाहेरील बाजूकडील पेशीत हरितवर्ण शरीरें अधिक असतात. पेशीमध्ये पोकळ्या जागजागी पुष्कळ दृष्टीस पडतात. ___ कोवळ्या स्थितीत ग्रंथी वर्तुलाकृतींत रचिल्या असून, पुढे ही स्थिति कायम राहत नाही. कारण ग्रंथीची रचना अव्यवस्थित होऊन त्या चोहोकडे त्याच स्थितीत पसरलेल्या आढळतात. बाह्यांगाकडील ग्रंथी लहान असून मध्यम अंगाकडील ग्रंथी पूर्ण वाढलेल्या व मोठ्या असतात. मध्यभागापेक्षां बाह्यांगाकडे