पान:वनस्पतिविचार.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

( Cellulose) व सत्त्वाची घटकद्रव्ये ह्यांमधील फरक आयोडीनने ओळखिता येतो.

 बटाटे, रताळी, गहू, तांदूळ, डाळ वगैरेमध्ये सत्त्व पुष्कळ असते. सत्त्वाचे सूक्ष्म कण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले असता एका मध्यबिंदूसभोंवतीं थरावर थर वाढलेले दृष्टीस पडतात. मग मध्यबिंदु मध्यभागी असो वा कोपऱ्याकडे असो, हा विशेष मुद्दा नाहीं. सत्व सूर्यप्रकाशांत सजीव हरिद्रंंजित ( Chloroplasts ) शरीराकडून तयार होते. कार्बनवायु हवेतून सूर्यप्रकाशांत हरिद्रंंजित शरीराकडून शोषिला जातो. कार्बनवायु पाण्याशी मिसळून कार्बन आम्ल बनते व पुढे त्याचे विघटीकरण होऊन शोषित पदार्थांशी मिसळल्यामुळे सात्त्विक पदार्थ तयार होतात.

 वनस्पतींच्या पानांमध्ये सेंद्रिय सत्त्व उत्पन्न होते खरे, पण तेथे फार वेळ टिकत नाही. जर पुष्कळ सत्त्व पानांमध्ये राहते तर त्यायोगे पाने खेचून भरली असती व असे होता होतां नवीन सत्व उत्पन्न होण्यास जागा न राहती. म्हणूनच त्यावर पाचक आम्लाची क्रिया होऊन ते सत्त्व विरघळून पेशीरसाशी एकजीव होते. यामुळे पेशीरसाबरोबर ते इकडून तिकडे वनस्पतिशरीरांत खेळले जाते. वनस्पतीच्या शरीरांत आंतील खोल भागीं सचेतन शुभ्रवर्णी शरीरें (Leucoplasts) असतात, त्यांचा परिणाम त्या विरघळेलेल्या सात्त्विक पदार्थांवर होऊन पुनः त्यांचे अद्राव्य सत्त्व बनते, व ते वाटेल त्या जागी येणेप्रमाणे सांठविता येते. जेथे जेथे वनस्पतीस ते सत्व सांठविण्याचे असते, तेथे प्रथम पेशीरसाबरोबर साखरेच्या द्राव्य स्थितीत ते पोहोंचते, नंतर शुभ्रवर्णी शरीर द्राव्य स्थितीतून त्यास न विरघळणारे पूर्वीप्रमाणे स्वरूप देतात. न विरघळगाच्या स्थितीत त्यास स्थलांतर करण्यास अडचण पडते, म्हणून पाचक आम्लाची विरघळविण्यास जरूरी असते.

 कांहीं ठिकाणीं सत्त्वाच्या उत्पत्तीस सचेतन हरिद्वर्ण शरीरांची जरूरी नसून सजीव तत्त्व आपल्या चैतन्यशक्तीने सत्त्वांची उत्पत्ति करिते. कमळाच्या परागवाहिनींत ( Style ) सत्त्वाचे कण उत्पन्न होतात. ह्यांची उत्पत्ति सजीवतत्त्व करीत असते. नायट्रोजनयुक्त न विरघळणारी द्रव्ये बीजांमध्ये कमी-अधिक प्रमाणांत नेहमी सांपडतात. त्यांचे कण लहान-मोठे