पान:वनस्पतिविचार.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७ वे ].     पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm) व केंद्र (Nucleus).     ५३
-----

पुढे सरकतात. अशा वेळेस त्यापासून बारीक केंसासारखे भाग ( Cilia ) उत्पन्न होऊन ते वल्ह्याप्रमाणे पेशींस पाण्यांतून जातांना उपयोगी पडतात, कांहीं ठिकाणी पेशीस स्थलांतर करण्यासारखी गति न मिळतां पेशीपासून जरूरीच्या प्रसंगी केंस बाहेर उत्पन्न होतात, व पुनः ते केस पेशींत परत घेतां येतात. केंस आवरून धरणे अथवा बाहेर सोडणे, हे त्याच्या मर्जीप्रमाणे तसेच जरूरीप्रमाणे घडत असते. अशा प्रकारची सूक्ष्मगती क्षुद्रवर्गीय प्राण्यामध्येसुद्धा आढळते. जसे, अमिबा प्राणि आणि एकपेशीमय वनस्पति ह्यांचा परस्पर भेद ओळखणे मोठे कठीण असते.

 सजीवतत्त्व आपल्या चैतन्य शक्तीमुळे केवळ सचेतन शरीरें उत्पन्न करिते. एवढेच नव्हे तर शोषित निरिंद्रिय द्रव्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार करणे हे काम सारखे सुरू असते. निरिंद्रिय पदार्थ प्रत्येक सजीव पेशींत थोडे बहुत प्रमाणांत आढळतातच. हे सेंद्रिय पदार्थ निरनिराळ्या घनतेचे असून निरनिराळ्या रीतीनें आपआपलेपरी वनस्पतीस उपयोगी पडतात. कांहीं अडचणीचे प्रसंगी उपयोगी पडावेत म्हणून वनस्पति त्यांचा साठा आपले शरीरांत निर्भय जागी करितात. मुळे, खोड, पाने अथवा बीजे, ही साधारणपणे वनस्पतीची सोईप्रमाणे अन्न सांठवण करून ठेवण्याची कोठारे आहेत.

 पेशी द्रव्यें:–ह्या सेंद्रिय द्रव्यांत कांहीं द्रव्ये नेहमीं पेशी रसामध्ये विरघळून त्याशी एकजीव झाली असतात, व कांहीं द्रव्य न विरघळतां पेशीमध्ये अलग राहतात. ह्या न विरघळणाऱ्या पदार्थाचाच बहुतकरून सांठा केला असतो. कारण तात्काल उपयोगी पडणाऱ्या व विरघळणाऱ्या पदाथांपासून सजीव तत्व जीवन कण तयार करते, व त्यापासून पेशीभित्तिका अगर पेशींरचना घटत जाते. साखर, सेंद्रिय आम्ले, त्यांचे क्षार, नायट्रोजनयुक्त शरीरे वगैरे पदार्थ तात्काल उपयोगी पडणारे असून पेशी रसांत सहज विरघळतात. बहुतकरून ते विरघळलेल्या स्थितीत असतात. सत्व, तेल, टॅॅनिन, कांहीं विशिष्ट रंग वगैरे पदार्थ दुसऱ्या वर्गापैकी आहेत. पैकी सत्व, चरबी व तेल हें विशेष महत्त्वाचे आहेत. साधारणपणे ते सर्व पेशींमध्ये आढळतात. मात्र त्याचे प्रमाण निरनिराळ्या वनस्पतींमध्ये निराळे असते. सत्त्वाची घटकद्रव्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन आहेत, हे पूर्वी सांगितलेच आहे. पेशी घटकद्रव्ये